सुधार
सुधार
सततची ती धावपळ, आता नकोशी झालीय.
थोडा का होईना, आराम करायची वेळ आलीय.
व्यस्त असतो काहीश्या कारणात, आता वेगळं व्हायला हवं.
आराम करण्यासाठी, शेवटचं एक कारण लावावं नवं.
पुन्हा धावायचय त्याच वेगाने, म्हणून एक उसासा हवाय.
थकल्याची जाणीव झाली, की करावा असा उपाय.
थोडसं रेंगाळाव आठवणीत, वेळ द्यावा थोडा स्वतःला.
कामाचं काय ते तयारच असतात, मोकळ्या दिसणाऱ्या हाताला.
खुप काम केलंय, असाही माझा काही दावा नाई.
पण रोजरोज तेच सार, म्हणून थोडा कंटाळा येई.
मोकळा श्वास आणी, थोडं हसणं मिळाव उधार.
व्यस्त आयुष्याला, एकदा प्रयत्नांच्या साथीने सुधार.
