"महान" "सावित्रीबाई फुले"
"महान" "सावित्रीबाई फुले"
पहीली महिला शिक्षक
सावित्रीबाई फुले....
स्री-शिक्षणासाठी जिने
केले ज्ञानाचे भांडार खुले
सावित्रीच्या त्यागाने
इतिहास महान रचला
स्री-शिक्षणासाठी जणू
उभा जन्म तिने वेचला
खंबीरपणे ज्योतिबाच्या
सोबतीला राहीली उभी
अजरामर झाले दोघेही
तयांची कीर्ती पसरली नभी
दगड-गोटे, चिखल-शेणाचा
मारा तिने साहिला...
स्री-शिक्षण, स्री-उद्धारासाठी
अवघाची जन्म तिने वाहिला...
दिन-दुबळ्यांची ती
माय जणू बनली....
व्यथा तिने सा-या
समाजाची जाणली....
वारसा स्री-शिक्षणाचा
अविरत चालू ठेवू.....
सावित्रीच्या महान कार्याला
असे अभिवादन देवू....
