एका निवांत क्षणी.....( प्रेम)
एका निवांत क्षणी.....( प्रेम)
एका निवांत क्षणी
तरीही विचार तुझेच मनी.
एक मंद झुळूक वा-याची अन्
हळूवार शब्द तुझेच कानी.
हा एकटेपणा सुद्धा
तुझीच जाणीव करुन देतो.
मी माझी नाहीच मुळी
हेच काहीसं सांगून जातो.
वाटतं, मग हे निवांत क्षण
तुझ्यासोबत व्यतीत करावेत.
स्वतःमध्ये रमून जाण्यापेक्षा
यात तुझ्या प्रेमाचे रंग भरावेत.
जगाला या विसरुन जावं
आपण एकमेकांमध्ये मग्न व्हावं.
अशा निवांत क्षणी मी तुला
अन् तू फक्त मला पहावं.
हे निवांत क्षण....
कायम आयुष्यात असावे.
एकमेकांशिवाय आपले
हे जगणे मात्र नसावे....
हे जगणे मात्र नसावे.....!

