सौंदर्य
सौंदर्य
कोण म्हणतं....
दिसण्याला महत्व नसतं.
मग का कोणी पाहताक्षणी
एखाद्याच्या मनात बसतं......
कशाला मग अट्टहास.....
विवाहपुर्व मुला-मुलींना बघण्याचा
का नाही प्रयत्न होत....
न बघता सोबत जगण्याचा ....
का रेखाटली जातात सुंदर चित्र
एखाद्याच्या आठवणींत
का रहातं सौंदर्य एखाद्याचं
खास मनाच्या साठवणींत....
कर्तृत्वालाही महत्व आहेच की
पण सौंदर्याचीही बात न्यारीच
निसर्ग असो वा असो व्यक्ती
सौंदर्य वेडी तर दुनिया सारीच..
ब्युटी विथ ब्रेन .....
मग तर सारेच वारे न्यारे
थक्क होतात हा मिलाप पाहून
सौंदर्याला कमी लेखणारे.....
मला वाटतं जळत असावेत....
सौंदर्याची घृणा करणारे
मग बघता कशाला नजारे...
नजरेला सुखावणारे.....
