" तू "जरा
" तू "जरा
1 min
258
काढू नको खपल्या, त्या जुन्या अता
वेदनांना तुझ्या, तू सांभाळ जरा
सांडू दे जरा,त्या आसवांना गालावरी
अन् भरुन येवू दे, मनाचे आभाळ जरा
जीवनी या नसेल उरला, गंध जरी
होवून मोगरा, एकदा तू गंधाळ जरा
तेच ते पुन्हा-पुन्हा, का विषय तुझे
चढले मनावर तुझ्या का, शेवाळ जरा
असह्य होत असतील, आज वेदना जरी
होईल दुःखावर औषध तुझ्या, हा काळ जरा
कशास शोधावा आनंद, इतरांमध्ये
तूच तुझ्या आनंदात, अता रेंगाळ जरा
वेढतो जर तुला, हा भुतकाळ तुझा
तोड भूतकाळाशी, अता तू नाळ जरा
