रंगमंच
रंगमंच
आयुष्याच्या रंगमंचावर....
कटपुतली सारखं नाचावं लागतं.
अनेक अडथळ्यांना पार करत
ध्येयापर्यंत पोहचावं लागतं.....!!
ख-या चेहऱ्यांवर ब-याचदा...
खोटा मुखवटा चढत असतो.
असाच काहीतरी बनावटी
प्रत्येक मनुष्य घडत असतो....!!
चेहऱ्यावरची निरागसता...
अशीच कधीतरी हरपून जाते.
स्वप्न पूर्ण होण्या आधिच
हे मन मात्र करपून जाते....!!
खरेपणा मनाचा जपावा कसा?
भ्रष्ट इथे प्रत्येक जन...
स्वतःचा शोध घेत फिरतं
होवून व्याकूळ कावरं - बावरं मन...!!
रंगमंचावर आयुष्याच्या ...
तारेवरची कसरत असते.
पुन्हा-पुन्हा सावरताना
आयुष्य मात्र घसरत असते....!!
