ओढ पावसाची
ओढ पावसाची


ओढ पावसाची,
रिमझिम सरींची
ओल्या तुझ्या मिठीतल्या
त्या जादुगिरीची
ओल्या दवात न्हाते,
मन मंत्रमुग्ध होते
मृदू-गंधाची जादू,
आसमंती विखुरते
व्याकुळ करते का मनाला?
ही अधीरता पावसाची
तप्त धरेलाही असते
ओढ जणू याच क्षणाची
इंद्रधनुच्या रंगामध्ये,
मन हे कसे रंगीत होते
टप-टप पडणाऱ्या थेंबांचे
सुमधुर कसे हे संगीत होते?
व्यापुन उरतो आसमंत सारा
ओढ पावसाची चरा-चराला
पाना-फुलांवर दवबिंदुंचे झुंबर
हिरवी मखमल जणू वावराला