STORYMIRROR

Jayshree Hatagale

Others

4  

Jayshree Hatagale

Others

तू थांब ना जरा...

तू थांब ना जरा...

1 min
273

रिमझिम झरणाऱ्या पाऊसधारा

अन् आडोशाला जरा निवारा

तुझ्या सहवासाची मंत्रमुग्धता

अन मनात फुलणारा मोर पिसारा

सगळं जपून ठेवायचंय

मला तुझ्या सोबत जगायचंय

तू थांब ना जरा...


पावसाचा ओलावा

अन तुझ्या मिठीतली आग

तुझ्यात हरवून गेल्यावर

तू मला घातलेली साद

सगळं जपून ठेवायचंय

मला तुझ्या सोबत जगायचंय

तू थांब ना जरा...


कोसळणार्‍या सरींना

अलगद ओंजळीत भरायचंय

तुझा हात हातात घेऊन

बेधुंद होऊन फिरायचंय

सगळं जपून ठेवायचंय

मला तुझ्या सोबत जगायचंय

तू थांब ना जरा...


तुझ्यासोबत या पावसात

चिंब चिंब भिजायचंय

तुझ्या प्रत्येक श्वासात

कस्तुरी गंध बनुन रुजायचंय

सगळं जपून ठेवायचंय

मला तुझ्या सोबत जगायचंय

तू थांब ना जरा...


नखशिखांत भिजल्यावर

मला तुझ्या नजरेतून बघायचंय

तू स्तुती माझी करताना

त्या प्रत्येक शब्दांमध्ये सजायचंय

सगळं जपून ठेवायचंय

मला तुझ्या सोबत जगायचंय

तू थांब ना जरा...


पानांवरच्या दवबिंदुना

नजरेत भरुन घ्यायचंय

एक स्वप्न सोनेरी भविष्याचं

तुझ्या नजरेतून पहायचंय

सगळं जपून ठेवायचंय

मला तुझ्या सोबत जगायचंय

तू थांब ना जरा...


Rate this content
Log in