वलय
वलय
उन्मळून पडली वृक्ष सारी
भावना रुपी मनाची
आजवर तग धरुन होती उभी...
हल्ली पूर्वीसारखं
तारांगण नाही राहिलं नभी
भावना रुपी लाव्हारस
खदखदत होता .....
अंतरंगात मनाच्या
वर्षानुवर्षे धगधगत होता
आता चिंगार्या उडताहेत
त्या नभाला जाऊन भिडताहेत
अंधाराला चिरत-चिरत
स्वतःचा मार्ग काढताहेत
आता जरा श्वास होऊन मोकळा
मनमुराद विहरतोय वाऱ्यासोबत
झटकून सारी जाळ्या-जळमटं
छेदत आहे भेदत आहे....
त्या शृंखलांना तोडून
लक्ष स्वतःकडे वेधत आहे
अस्तित्वाची कुणकुण लागली आहे
मनाच्या गाभाऱ्यात......
उमेद तशी जागली आहे
कित्येक वर्षांनी..................
स्वतःच्या नावाभोवती
वलय निर्माण करण्याचं
स्वप्न उरात जागलंय
मन पहिल्यांदाच असं
शहाण्यासारखं वागलंय.......
