मखमली गवतावरी.... निसर्ग
मखमली गवतावरी.... निसर्ग
1 min
407
अत्तराला भाव नाही, गंध मातीचा नवा
सांज ढळता सोबतीला, चंद्र जणू हा काजवा
रातराणी , केवडा अन् धुंद आहे मोगरा
मोरपंखी रंग सारे, इंद्रधनु झाली धरा
मखमली गवतावरी, विसावले हे मन जरा
पावसाच्या सोबतीने, होई क्षण सुखाचा साजरा
चिंब साऱ्या भावना या, जपूनी ठेवता अंतरी
जन्म घेते रोज नव्याने, एक आशा का तरी?
पावसाचे गीत ओठी, शब्द सारे झाल्या सरी
जीवनाला अर्थ आला, छेडिली कुणी ही बासरी?
