प्रश्न कोरे.... उत्तरे कोरी
प्रश्न कोरे.... उत्तरे कोरी
1 min
11.7K
कधी नसावेत प्रश्न
तर, कधी निरूत्तर व्हावे
अबोल असले शब्द जरी
तरी समजून जावे.....
कोरे असले पान जरी
उमटतील तिथे भाव नवे
अदृश्य ते समजून घेणारे
कुणीतरी खास हवे......
उत्तरं येत असतानाही
प्रश्नांना कधीतरी टाळावे
रंगीबेरंगी गुलाबावर नाही
कधी मोगऱ्यावरही भाळावे
मनाला मनाचे......
अवगत गणित व्हावे
प्रश्न अन् उत्तरांशिवाय
जगता सहज यावे........ 😍
कोऱ्या मनाच्या पानावर
नव्याने काही लिहीत जावे
नवे गीत, नवे संगीत....... 🎼
नव्याने कधी गुणगुणावे🎤 😍
