STORYMIRROR

Savita Kale

Inspirational Others

4  

Savita Kale

Inspirational Others

शौर्य म्हणजे तानाजी मालुसरे

शौर्य म्हणजे तानाजी मालुसरे

1 min
1.2K

मासाहेबांनी आदेश दिला शिवबांना

स्वराज्यात आणावा किल्ला कोंढाणा

तानाजी म्हणे आज्ञा द्यावी आम्हाला

कोंढाणा मिळवून देईन स्वराज्याला ।। १।।


संगे तीनशे मावळे घेऊन निघाला

जाऊन पोहचे किल्ल्याच्या पायथ्याला

गड चढणे होते फार कठीण

त्यात रात्र किरकिरे महाभयाण ।। २।।


दोर बांधून यशवंती घोरपडीला

सरसर चढून पार केले कड्याला

तुटून पडली वानरसेना शत्रूवर

केले सपासप वार खोलवर ।। ३।।


चवताळून उठला किल्लेदार उदेभान

तानाजी सिंहासारखा वार करी पलटून

ढाल तुटता, शेल्याची ढाल करून

लढला मर्द मराठा, राखली शान ।। ४।।


स्वराज्याला कोंढाणा मिळवून दिला

पण सिंहासारखा मावळा गमावला

तानाजींच्या स्वामीभक्ती नि शौर्याला

शिवरायांनीही नमविले मस्तकाला।। ५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational