महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्राची संस्कृती
महाराष्ट्र राज्य एक भारत देशाचे
अठ्ठावीस राज्यात आहे ते महान
पुरातन इतिहास संस्कृतीने भरलेले
म्हणूनच आहे मला त्याचा अभिमान.
शिवकालीन संस्कृती शिवबाची
झळके ती प्रत्येक छत्तिस जिल्ह्यात
आजही तुम्ही पाहू शकता तिला
महाराष्ट्रातल्या शिवबाच्या किल्ल्यात.
थोर संतांची भूमी महाराष्ट्र
आजही संतवाणी लोकां तोंडपाठ
देव देवतांचे जागृत महाराष्ट्र
दिंड्या पताकांत लोक गातात हरिपाठ.
साधे भोळे बांधव शेतकरी
कष्ट करण्या नाही घाबरत
शिवार त्यांचे फुले एकमात्र
पावसाच्या नियोजित पाण्यात.
शूर,धाडसी वृत्ती, करारी बाणा
एकमेव पहावा तो महाराष्ट्रात
शिवबाची संस्कृती भिनलीय
महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांत.
उपास-तपास, पुजा-अर्चा, दान-धर्म
लोकां आदर-तिथ्य व स्वाभिमान
नसा नसात भरलाय महाराष्ट्र लोकांत
म्हणून मला आहे महाराष्ट्राचा अभिमान.
