अंधश्रद्धेचे निर्मूलन करा
अंधश्रद्धेचे निर्मूलन करा
अंधश्रद्धेचा करता स्वीकार
श्रद्धेचाही बदले आकार
भलेभलेही होती बेजार
मनालाही जडे विकार
श्रद्धा ती अंध
नाही तिला बंध
स्वतःतच धुंद
तुटे समाज एकसंध
युग हे विज्ञानाचे
नाही खोट्या श्रद्धेचे
निर्मूलन करा अंधश्रद्धेचे
गीत गा आनंदाचे
