काय हरकत आहे.?
काय हरकत आहे.?


चांगलीच आहे दुनिया पाहाल तर
आपलीच विचारांशी फारकत आहे.
रुजव्याची मुठीने सुरुवात तर करा
चांगल्या वाणाला अहो बरकत आहे.
नुसताच डामडौल बरा नव्हे सारखा
साध्याच माणसाला सांगू फार पत आहे
वेळीच सावरावे जाण्याआधी वेळ माणसा
काटा घडीचा आजही पुढे सरकत आहे.
थांबलंय का कधी चक्र जगण्याचं कशाने
मनाजोगे जगून पाहा ना, काय हरकत आहे?