सलाम सैनिक हो...
सलाम सैनिक हो...
सलाम सैनिक हो.....
सलाम सैनिक हो... सलाम तुम्हाला
मृत्यूला उराशी बाळगणाऱ्यांना .....
ना होई शब्दात व्यक्त तुमची स्थिती
पाहताच तुम्हाला दगडांनाही पाझर फुटती....
इवलेसे रोप ते रोज वाट पाही बाबाची
अभिमानाने आई त्याला खत पाणी घाले शौर्याची....
निस्वार्थ अशी तुमची भक्ती भारतमातेच्या चरणी
शेवटचा श्वासही घेता भारत माता की जय म्हणूनी.....
नाळ जुळलेली तुमची या भूमातेच्या उदरी
बलिदान तुमचे शुर आबांच्या शुर छाव्या परि.....
व्यर्थ ना जाऊ देऊ आम्ही तुमचे त्याग अन बलिदान
घडवू सुसज्ज भारत घेऊ नव्या जगाची आण...