तारा......
तारा......
1 min
490
चल रे गड्या हो रं पुढं
टवकारून बघती तुला रं मुढं...
नको चिंता कोण काय विचार करील
सारे एकाच माळेचे मणी
सारे एकाच माळेचे मणी, जो जसे करील तो तसे भरील....
नाती मित्र प्रेम पैसा जग हे सारेच मिथ्य
उमजेल हे जेव्हा तुला
उमजेल हे जेव्हा तुला, गवसेल तेव्हा जगण्यातील तथ्य....
मानवधर्म म्हणूनी आपण आपले कर्म करावे
बाकी सारे दैवावर
बाकी सारे दैवावर, सोडून होईल तितके करीत जावे....
कमनशिबी ना समज स्वतःला जरी सार्यांनी टाकलेला
टिकवूनी ठेव जिद्द तुझी
टिकवूनी ठेव जिद्द तुझी, दैदीप्य तारा तू आकाशातला....
