STORYMIRROR

Ashwini Gorivale

Inspirational

4  

Ashwini Gorivale

Inspirational

उमेद

उमेद

1 min
1.0K


जगणे.....

काही मनास उमजेना

काय करावे कळेना...

प्राक्तनाच्या रेषांपुढे

कसे झेपावे सुचेना...


दोन बाजु वाजे ढोलकी

सारे गाजावाजा करीती

घडे तेच जे प्राक्तनी

अन्

ना राहावे त्यावर विसंबूनी...


वाट चालता चालता

गाठ सुख- दु:खाशी ही होई

प्राक्तनावर खापर फोडूनी

हात घ्यावे वर करूनी...


जात हीच माणसाची

रोज कोण त्याला रडे

कात मागे टाकूनी

नव्या पायवाटेस तो लागे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational