बाप
बाप
बाप कसा असा असतो,
उकडले बीज जमिनीत जसे,
कवच भेदुन येतो,
रोप कोवळे. भूमीवर आणतो.
बाप कसा असा असतो,
काटेरी फणस कसे,
आत गर असतो,
अंगा काटे लावुन,
गर जपुन ठेवतो.
बाप कसा असा असतो,
कठीण कवच खडकाचे
आत पाण्याचे झरे वाहतो.
सौम्य होऊन सारा,
शितल जल वाहतो.
बाप कसा असा असतो,
ढग काळा दिसतो,
सुखाचे कारणे,
जलधारा बरसतो.
बाप कसा असा असतो,
राब राब राबतो,
मुलीच्या सुखासाठी,
जावायाचे पाय धुतो.
बाप कसा असा असतो,
मुलगा असावा सुखी,
म्हणुन,सुनेस लेकरा म्हणतो.
बाप कसा असा असतो,
भरला संसार उचलतो,
रडते माझी आई,
तेव्हा बाप माझा हसतो,
एकांत पाहुनी अश्रू,
आपले, वाहतो.