Chandan Pawar

Inspirational


4.0  

Chandan Pawar

Inspirational


शिवराज्य

शिवराज्य

1 min 11.9K 1 min 11.9K

शिवरायांच्या बोलण्यात जरब

 नजरेत धगधगती आग

सह्याद्रीच्या दरी-खोरी 

 गुजे स्वराज्यगीताचा राग


मोजक्या मावळ्यांसह उघडले 

हिंदवी स्वराज्याचे द्वार

गनिमी काव्याचा दूरदृष्टीने 

शिवराय होई घोड्यावर स्वार


 हाती तळपती समशेर 

साक्षीला असे अंधार

शत्रु सुसाट पळे पाहुनी

 शिवरूपातील थरार


रयतेच्या कल्याणासाठी

 स्वराज्यधोरण आखले

मायभूच्या स्वातंत्र्यासाठी 

मावळे रक्ताने माखले


 शेतकरी बळीराजा झाला

आनंदी प्रजा - मावळे

 जगण्यासाठी नव्हे तर 

मरण्यासाठी शिवकाळात सोहळे


 स्वराज्यजनक शिवबाने

 संघर्ष कृतीतून दाखवला

हिंदवी स्वराज्याचा भगवा 

दाही दिशात फडकला


असे सुजलाम-सुफलाम 

शिवराज्य साऱ्या महाराष्ट्रात

शिवराय महाराष्ट्राच्या घराघरात

प्रत्येकाच्या मनामनात


Rate this content
Log in

More marathi poem from Chandan Pawar

Similar marathi poem from Inspirational