भारुड
भारुड
अग, अग सखू
गाजावाजा झाला, गाजावाजा झाला
कशाचा हो धनी?
सारा गाव गोळा झाला
स्वच्छतेचा डांगोरा पिटला
फोटो काढून सायबाला पाठवला
दुसऱ्या दिवशी साऱ्या रस्त्याला हागणदरी युक्त गाव दिसला
तातपुरता देखावा केला
हागण दरिचा फोटो नाही गेला.
चमकोगिरीचा सोहळा पार पडला
(काय म्हणता धनी?
हो, हो खरे आहे, खरे आहे
आदल्या दिवशी स्वच्छतेचा फोटो असतो.
दुसऱ्या दिवशी परत घाण साचलेली दिसते)
मग काय करायचे आपण?
नको फोटो, नको प्रसिद्धी, आपल्याला
स्वच्छ करू आपल्या साऱ्या गावाला
गाडगे महाराजांचे विचार अनुयायी आपण
कृतीत आणु आपण स्वच्छतेला
गावागावात आपण फिरू
शाळा, शाळात आपण फिरू
स्वतः हातात झाड़ू घेऊ
नंतर जगाला उपदेश करू
स्वच्छतेचा संदेश देऊ
तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे नेऊ
बापुजींचे स्वप्न साकार आपण करू
(खरे आहे धनी, फोटो काढून एक दिवसाचा देखावा नको. हे काम दररोज खेड्यातून, शहरातून झाले पाहिजे)
आपला गाव स्वच्छ आपण करू या
अंतकाळजातून इच्छा बाळगुया
सारे गावकरी एकत्र या रे
हागण दरी गाव मुक्त करा रे
प्रत्येकाला शौचालय द्यारे
हागण दरी मुक्त गाव करा रे
(खरोखर धनी, याला म्हणतात स्वच्छता अभियान
त्यात नसावा मानापानाचा ,आदर आणि सन्मान
सेवक म्हणून करावा आपला कष्टाचा सन्मान)
