STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Inspirational

3  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

अशा मर्दानगीला अर्थ नाही

अशा मर्दानगीला अर्थ नाही

1 min
12K

ती विव्हळत असते, ती किंचाळत असते

ती मदतीचा हात मागत असते

तो मात्र उघड्या डोळ्यांनी तिचा आक्रोश पाहत असतो

अशा मर्दानगीला अर्थ नाही...


ती विरोध करत असते, ती धडपडत असते

हात जोडून विनवणी करत असते

तो मात्र तिच्यावर चाल करुन तिला चिरडत असतो

अशा मर्दानगीला अर्थ नाही...


बेशुद्ध अवस्थेतून ती शुद्धीवर येत असते

समाजाकडे पाठ फिरवून शून्यातून नव्याने उभी राहत असते

तो मात्र तिच्याच चारित्र्याचे वाभाडे काढत असतो

अशा मर्दानगीला अर्थ नाही


ती लढत असते, हरूनही पुन्हा जिंकत असते

नव्या क्षितिजात यशाची भरारी घेत असते

तो मात्र कुत्सिततेने तिचे पाय खेचत असतो

अशा मर्दानगीला अर्थ नाही 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational