स्त्री महिमा
स्त्री महिमा
स्त्री म्हणजे नात्यांची वीण
सहनशीलतेचा तिच्यात बाणा
प्रेमाचे नातेसंबंंध जुुळविते
माहेर, सासरचा जणू कणा
अर्धांगिनी, भावी माता ती
अंकुर उदरी वाढविते
वेद पुराणातही तिचा महिमा
संहारण्यास चंडिका बनते
सावित्री, आनंदी, जिजाऊ होऊनी
संस्कारी भावी पिढी घडविते
कल्पना, सुनीता समान विरांगना
आसमंतात उंच जाऊनी झेपावते
नवजीवाची अधिकारीणी ती
सहनशीलता, नावीन्यतेची मूर्ती
कर्तव्यनिष्ठ,करुणा, ममता अंगी
किती सांगू! विविधरुपी कीर्ती
