STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

झंझावात

झंझावात

1 min
11.6K


छत्रपती शिवराय रयतेचं

खरंखुरं धन होतं,

स्वराज्याची साद घालणारं

रयतेचे मन होतं

 

रयत हिताकरिता शिवरायांनी 

दिलं जीवनाचं दातृत्व,

मावळ्यांप्रती जीवापाड प्रेम 

सलोखा आणि बंधुत्व


रयतेवरील अन्याय-अत्याचार 

नव्हता राजेंना मान्य,

"परस्त्रीला मातेसमान"

 मानणारे शिवराय धन्य


संकटांचा सामना करण्यास 

शिवराय कधीही तयार,

संकटनिवारण झाल्याविना 

माहीत नव्हती माघार


जुनाट वाटा सोडून 

शोधल्या नवीन वाटा,

गनिमीकाव्याने काढला 

शिवरायांनी शत्रूचा काटा


असं हे झंझावात 

आयुष्यात कधीही न थांबणारं,

नियतीला झुकवणारं पण 

कोणाही पुढे न नमणारं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational