देवदास
देवदास


खरंच मी मनापासून
प्रेम केलेय तुझ्यावर..!
तरीही कायम दुर्लक्ष
केलेस माझ्या प्रेमावर..!!
उघड प्रेम कधी मला
तुजवर करता आले नाही ..!
माझ्या मनातला प्रेमभाव
कधी तुला समजला नाही..!!
तुझ्या प्रेमात आंधळा होऊन
डोळे मिटून चालत राहिलो..!
व्याकूळ, कासावीस होऊन
वाट तुझी पाहत राहिलो..!!
ध्यानी मनी हृदयी स्वप्नी
मी नित्य तुलाच पाहिले..!
खरचं सांगतो ग प्रिये
माझे जीवन तुला वाहिले..!!
माझे प्रेम कळेल आशेने
पुन्हा पुन्हा विनवत राहिलो.!
भीक मागून मागून तुझी
प्रेमात तुझ्या ' देवदास ' झालो ..!!