प्रत्येक क्षणी..
प्रत्येक क्षणी..


पहिलीच भेट तुझी अन माझी
कोरलेली काळजात अजूनी..!
आठवणी साऱ्या जिवंत नेहमी
प्रेमअनुभूती प्रत्येक क्षणी..!!
खुल्या डोळ्यांनाही भास जाणवतो
मिठीचा गोडवा अजून तनी- मनी..!
रोम रोम पुलकित आठवणीत
प्रेमगंध दरवळे प्रत्येक क्षणी..!!
आभासात भास हीच अनुभूती
हवीहवीशी वाटे मिठी या जीवनी..!
स्पर्श तुझा साक्षी त्या भेटीचा
भास तुझा प्रत्येक क्षणी..!!
स्पर्श तुझा मनाला अस्थिर करतो
एकेक क्षण जागा होतो नयनी..!
आठवणी तुझ्या काळजात माझ्या
देह माझा रोमांचित प्रत्येक क्षणी..!!
होऊ दे सलगी अधरांची अधरांशी..!
सखे भेटू पुन्हा उद्या पाहिला कुणी..!
मी रत्नाकर.. तू सरिता हो...
मिठीत विरघळू प्रत्येक क्षणी..!