स्पंदनं माझ्या हृदयाची..
स्पंदनं माझ्या हृदयाची..


कसं सांगु तुला स्पंदनं माझ्या हृदयाची..
तरंग उठतात मनी घालमेल गं जिवाची..
रोजच सवाल उठती,फिकीर का जगाची..
तुझ्याच मनात रहावे पर्वा नको कुणाची..
कसं सांगु तुला स्पंदनं माझ्या हृदयाची..
आस प्रिये तुझ्या रेशीम मिठीतील प्रेमाची..
वाट पाहीन तुझ्या गोड गुलाबी शृंगाराची..
तुझ्या प्रेमभऱ्या नजरेत मी सदा असण्याची..
कसं सांगु तुला स्पंदनं माझ्या हृदयाची..
चारचौघीत असतांनाही आठवण यावी माझ्या अस्तित्वाची...
लाजूनी अनुभवशील रोमांच माझ्या प्रेम भावनांची..
गरम उसासे सोडत वाढेल धडधड उराची..
कसं सांगु तुला स्पंदनं माझ्या हृदयाची..
गौर कांती तुझी जणु चांदणी तू शुक्राची..
डोळे टपोरे तुझे जणु रुपगर्विता मिनाक्षी..
हास्य अनुपम जणु थंड झुळुक वाऱ्याची..
कसं सांगु तुला स्पंदनं माझ्या हृदयाची..
कशी करावी कुणी सर गं तुझ्या सौंदर्याची..
सखे अप्सरा तु ,माळ बावनकशी सोन्याची..
मी सखा तुझा, तु राणी माझ्या तनमनाची..
कसं सांगु तुला स्पंदनं माझ्या हृदयाची..