अबीर गुलाल
अबीर गुलाल


लिहितो मी एक प्रेमकविता
माझ्या निष्पाप ह्रदयातून..!
फक्त अश्रू अनावर करु नको
सखे तू तुझ्या डोळ्यातून !!
हेटाळले तू फेटाळले तू
जीव तरसतो आहे..!
तुझ्या अबोला दुराव्याचा
घाव वर्मी बसत आहे..!!
थांबून जायची सखे
स्पंदने माझ्या हृदयाची..!
जेव्हा भाषा करायची तू
मला सोडून जाण्याची..!!
दुःख दे कितीही पण माझ्या
प्रेमाची तुलना करू नकोस ..!
माझ्याएवढा जीव कोणी लावेल
अपेक्षा कधी बाळगू नकोस..!!
या देहाचा करून गुलाल
मी अबीर उधळत जाईन..!
थोडा थोडा तुझ्यामध्ये
मी रोजच जळत राहीन..!!