STORYMIRROR

Manisha Awekar

Inspirational

3  

Manisha Awekar

Inspirational

जीवन

जीवन

1 min
157

जल तोय बिंदू नीर, नावे विविध पाण्याची

धारा लाटा थेंब गारा, नाना रुपे जीवनाची  (1)


अती आवश्यक असे, वदे जीवनचि यासी

कृषीवलां प्राणसखा, लागे दृष्टी अंबरासी  (2)


पाणी जिरवा अडवा, नानाविध या योजना

बांध धरणे घालती, ज्यादा पाणी अडविण्या  (3)


पाणी टंचाईचा काळ, तीव्र उन्हाळ्यात असे

नारी दूरवरी जाई, कष्ट अगणित सोसे  (4)


गाळ साठे पाण्यामधे, होई जंतुप्रादुर्भाव

तृषार्ताला प्यावे लागे, नसे दुसरा इलाज  (5)


जल शुद्ध लाभो सर्वां, गरजच ती सर्वांची

असे नित्यचि योजना, जलशुद्धीकरणाची  (6)


कृपावंत होई राजा, सरसर धारा देई

आबादानी होई तवा, बळीराजा सुखी होई  (7)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational