प्रीत (सहाक्षरी)
प्रीत (सहाक्षरी)


शेतकरी घाम
पाझरतो शेती
धान्याची हो रास
प्रीत शेतीवरी ॥१॥
आईच्या कुशीत
ऊब ती मायेची
स्वर्गीय आनंद
प्रीत मातृत्वाची ॥२॥
धरूनिया बोट
साथ लेकराची
चिमुकला हात
प्रीत पितृत्वाची ॥३॥
नातवांच्या साठी
बोबडे बोलती
आजी आजोबांची
प्रीत हो हक्काची ॥४॥
सीमेचे रक्षण
शीर हातावरी
स्वप्नी बलिदान
प्रीत राष्ट्रभक्ती ॥५॥