STORYMIRROR

Rohit Khamkar

Inspirational Others

3  

Rohit Khamkar

Inspirational Others

देह

देह

1 min
206

तारुण्याचा गाजावाजा, मिरवतो मोठ्या तोऱ्याने.

बालपणीचा उठाठेव, शेवट म्हातारपणाच्या मरणाने.


बळ दाखवी तारुण्यात, कामे वाटी सगळी लहान.

कातरदाह शरीर हे होई, सरत्या वेळी प्रवास महान.


प्रवास तो एक वेगळा, मृत्यूच्या जवळ जाण्या.

जन्मवेळच ती निश्चित होई, एकदाचा शेवट होण्या.


म्हणूनी काय जगणे सोडावे, वा वाट अंताची पहावी.

सगळं जवळ असताना, कश्यासाठी मनाची इच्छा व्याकुळावी.


सुख शोधण्यासाठी, खर्च केले आयुष्य पूर्ण.

शेवटी आयुष्याच्या वृक्षाच्या, अलगद गळून पडले देह पर्ण.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational