STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational Others

3  

Rajendra Udare

Inspirational Others

सर्कस

सर्कस

1 min
227

टीचभर पोटासाठी चालते सर्कस

करावी लागते कसरत रांत्रदिवस


पुरुषस्त्रिया लहान मुलांची अदाकारी

मुके प्राणी पक्ष्यांची किमयाच भारी


उंच सुंदर रूबाबदार कलावंताची अदा

अनं ठेंगणे विदूषक हसवी खदाखदा


झोक्यांची कसरत डोळयांचे पारणे फेडते

मौत का कुवाँ हृदयाचे ठोके चुकवते


सर्व असतात एक दुसऱ्यावर अवलंबून

एकमेकांना घेतात बरं फार सांभाळून


तीन तासांची करमणूक सोपी वाटते

मात्र टीचभर पोटासाठीच धडपड असते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational