माझ्या दादांचा मळा... (चित्रकाव्य)
माझ्या दादांचा मळा... (चित्रकाव्य)
माझ्या साहेब दादांच्या मळ्यात
वाहते हो साहित्याचे पाणी
त्यातून फुलते-बहरते कवितांची हिरवाई
निळेशार पाणी जणू कृष्णसख्याचं
हो सावळं रूप
माझा दादाही शेतात राबतो खूप
सर्जा-राजाची जोडी खिल्लारी
त्यांच्या संगतीने दादानी कष्टाने
पिकवली हो गहू, बाजरी, ज्वारी
मळ्यात बांधानी कित्येक झाडांचा हो पसारा
येता-जाता मळ्यात मोरही फुलवतो पिसारा
ताडा-माडा बरोबर आंब्याला ही मोहर लागला
दादाच्या मनात वेल वहिनीच्या आठवणींचा बहरला
येईल दादाच्या सोबतीला वहिनी गोजिरी
मळ्यातल्या घराला हो लक्ष्मी साजिरी
असाच फुलो सदा माझ्या दादाच्या आयुष्याचा मळा
माहेरची आठवण येता भरून येतो माझा गळा
