STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

पणती..

पणती..

1 min
196

एका गर्भवतीला तिचा

गर्भ बोलत होता

दोन मनांच्या पारड्यात

विचारांना तोलत होता.


आई, वंशाला दिवा हवा

असे पिढ्यानपिढ्या म्हणती

पण घराला उजेड दाखवत

असते देव्हाऱ्यातली पणती.


आई, मीच तुझ्या मनाच्या

गाभाऱ्यातील एक संस्कारबीज

अन मलाच उदरात खुडून

म्हणतेस 'तू कायमचं नीज'


आई, तू सुलक्षणी-सद्गुणी

तुझ्यातच देवतांचा वास

मग मला गर्भातच मारून का

देतेस तुझ्या अस्तित्वाला फास?


आई, तू आशीर्वाद-प्रेरणा व

वात्सल्याचा निर्मळ आरसा

मग त्या आरशात पहा

मीच आहे तुझा वारसा.


आई, जसं नदी जीवनाचं

समृद्धीच मानतो आपण लॉजिक

तसं मुलगी हासू-आसू,

कला-साहित्य-संस्कृतीच मॅजिक.


म्हणून विनवते सर्व आई-बाबांना

आम्हांला गर्भातच नका मारू

उद्या पाळण्याची दोरी हाती

घेऊन आम्हीच जगाला तारू.


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational