STORYMIRROR

Gajanan Pote

Inspirational

3  

Gajanan Pote

Inspirational

तू हरु नको

तू हरु नको

1 min
195

थोडा धिर धर सर्व चांगल होईल

संयमाने काम कर प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल।। 

दिवस कठीण आहेत म्हणून काही लोक हसतील, टोचून बोलतील

विश्वास ठेव स्वतःच्या कर्तृत्वावर हेही दिवस संपतील।। 

आपलीच माणस तुला आपल मानतील, दुःखात तेच साथ देतील

मन आणि डोक शांत ठेव तुला प्रगतीचे अनेक मार्ग दिसतील।। 

लोक वाईट वागतील, त्रास देतील म्हणून तू तसा वागू नको

आपल्या चांगल्या वागणुकीचा, संस्काराचा त्याग करू नको।। 

विजय तुझाच होईल दृढ निश्चयाने कर्म कर

तुच तुझ्या हिंमतीने यशाचे शिखर सर कर।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational