महात्मा गांधीजी
महात्मा गांधीजी
भारताची शान बापू
बनले जगी महात्मा
मरण न मारू शकले
अमर त्यांचा आत्मा
करो किंवा मरो
दिला देशाला मंत्र
सत्य आहिंसा असे
त्यांचे महाशस्त्र
सत्याच्या मार्गावर चालणे
त्यांचा एकमेव संदेश
अन्यायाविरुद्ध निरंतर
लढणे त्यांचा उद्देश
त्यांचा जन्म झाला
जग उज्वल करण्यासाठी
आजही ते जिवंत आहेत
यांच्या महान कार्यासाठी
अशा महान पुरुषाला
सलाम आम्ही करू या
त्यांच्यासारखे होण्याचा
आम्ही यत्न करू या
