स्वच्छता
स्वच्छता
1 min
196
फिरण्याच्या नावने कचरा
फेकून अस्वच्छ केले रान
हाती घेऊन झाडू आपण
स्वच्छ करूया सगळी घाण
स्वच्छतेचे महत्व सांगून
एकमेकांना ज्ञान वाटूया
सुका-ओला वेग वेगळा
कचरा आधी निवडूया
जो कोणी घाण करेल त्याला
स्वच्छतेची करूया जाण
स्वच्छता सदैव राखण्याचे
हृदयी ठेऊ आपण भान
स्वच्छतेचे लक्ष हेरुनी
मारुया झाडूचे बाण
सुराज्य स्वच्छ करुनी वाढवू
आम्ही मातृभूमीचा मान
