गोव्यात
गोव्यात
1 min
238
सुर्य किरणाच्या सोबत
कोकीळा सुरात गाती
माझ्या गोव्यात लोकांच्या
अनेक प्रकाराच्या जाती
उत्सवाच्या आनंदात
जुळतात अनेक नाती
गोव्याच्या बायकांची आवड
असे फुलांच्या फाती
गोव्याच्या भूमीत
लाल काळी माती
गोव्याच्या कुळघरात असे
माड पोपळीच्या राशी
ज्ञान पराक्रमाच्या पेटतात
उज्ज्वल अशा वाती
सदैव असे वीरतेचा
झेंडा आमच्या हाती
