STORYMIRROR

Pooja Gawas

Abstract

3  

Pooja Gawas

Abstract

दिवाळी

दिवाळी

1 min
220

पावसाळा संपून 

थंडी लागली पडू


धुक्याच्या गारठ्यात

शेकोट्या लागल्या धडधडू


दिवाळीच्या चाहूलीने

घरे लागले सजू


नरकासुराच्या तयारीने

गाव लागले गजबजू

 

चकल्या करंज्यांचा खमंग वास

घराघरातून लागला दरवळू


आकाश कंदील, पणत्यांनी

घर लागले उजळू


झाले गेले विसरून सगळे

नव्या युगाचा मार्ग धरू


हा दिवाळीचा सण मोठा

आनंदाने साजरा करू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract