STORYMIRROR

Pooja Gawas

Children

4  

Pooja Gawas

Children

आॅनलाईन शाळा

आॅनलाईन शाळा

1 min
212

कुठल्याशा कोरोनामुळे शाळा झाली बंद 

सगळी मुले घरात बसून पुरती झाली मंद


वर्ग, पाटी, पुस्तक, फळा, खडू लागले रडू

विचारताहेत प्रश्न कधी करताय शाळा सुरू 


मास्तरांच्या बोटातला ढिला झाला चाप

गृहपाठ, परीक्षा, अन् हजेरी सगळं झालं माफ


गुगल मीटवर भरते आमची रोज रोज शाळा 

मोबाईलची छोटी स्क्रीन झालाय डिजिटल फळा


मोबाईलच्या स्क्रीनवरच मुलांचे मैदान गाजते

रात्र रात्रभर पब्जीची बंदुक जोरात वाजते


तेव्हा म्हटलं आता मागणी थेट वर करू

सरकार मामा ऐका आमचं शाळा करा सुरु!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children