STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

उन्हाळा

उन्हाळा

1 min
295

झाला उन्हाळा, उन्हाळाच झाला

दिसे आज मरण, ज्याचे त्याला.।


संपून गेली, जगण्याची आशा

कोरडयाच साऱ्या, दाही दिशा.

पडली कोरड पापणीला.।


पेरलेले सारं, गेलं करपून

जगण्याचं सपन गेलं विरुन

जीव झाला वेडा सांगू कुणाला..।


कोरडं सपन किती आता पहावं

काय खावं, प्यावे, कसं जगावं.

दिला दगा पावसाने, साऱ्या जगाला..।


आषाढ, श्रावणात कसा हा वणवा पेटला?

प्रश्न जगण्याचा मोठा, कायमचा मिटला.

हरविले निसर्गाने आज मानवाला.।


मातीमोल झाली केलेली पेरणी

पाणी पाणी करते कासावीस धरणी

व्हावे कसे अतूर सारे मरणाला।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational