STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

3  

Savita Jadhav

Inspirational

विधिलिखित

विधिलिखित

1 min
460

काय आहे विधिलिखित?

जे जन्माआधीच लिहून ठेवलंय,

खरचं असं होतं का?

हे कुणी बरं पाहिलंय?


विधिलिखित काय असेल?

जाणून घेणं पोरकटपणा सारा,

घडून गेलेल्या अनाठायी गोष्टींचा,

विचार नाही केलेला बरा.


भविष्यात काय होईल जाणून घेण्या,

कशाला उगाच करावी पायपीट,

विधिलिखित आहे समजून,

उगाचच चिंतातूर होऊन करावी खिटपिट.


आपलं भविष्य आपल्या हाती,

मेहनतीचा करावा पाठपुरावा,

फुकटच्या अंधश्रद्धेच्या पायी,

का जन्म वाया घालवावा.


विधिलिखित काय असेल,

ठाऊक नसेल कुणाला,

करावे सत्कर्म, सदाचरण,

घडवावे सुंदर आयुष्याला.

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational