आदर एक दैवत भावं
आदर एक दैवत भावं
सुंदर आत्मतेचं भूषण
आदर एक दैवतभाव
नम्रशीलतेचा संस्कार असं
प्रत्येकाला आदराने बघतं
पूज्यभाव पुजलं जातं
पेरावं तसं उगवतं
चांगुलतेची डोर ही
मनामनाला जुळवतं
आदर एक आपुलकीचं
पवित्र प्रेमाचं नातं असतं
कधी वडीलधारी गुरुजनांचं
तर कधी मित्र भावंडाचं
आदर एकतेत एक
चालणारं चलन असतं
बागेत मेहनतीचं
मिळणारं फळ असतं
सद्गुणांचा ठेवा दिसतं
जिथं आदराचं भाव असतं
पाणी घेण्याचं भांडं जसं
जिव्हाळा वाढवण्याचं पात्र असतं
आदर एक दारच असतं
आपलेपणात शिरण्याचं
पण कोण कुठे ही असो
समानतेचं भाव दाखवत असतं
आदर हे आदरून येतं
मुखवटा घेऊन चालू नये
भल्यानं भलंच होतं
स्वार्थानं का फसवावं
आदर द्यावं असं
आदरते योग्य असावं
महानतेचे गुण काही
लहान मोठ्यात पण बघावं
आदर घ्यावं असं
आदर्श बनावं
स्वाभिमानाचं शिखर
मानानं डोलावं
