Chandan Pawar

Inspirational


4.0  

Chandan Pawar

Inspirational


जवान

जवान

1 min 11.9K 1 min 11.9K

सीमेवर तैनात होऊनी

शत्रूचा नाश करतात;

देशाच्या रक्षणार्थ जवान

'एकी'चा जयघोष करतात.


कृतीतून व्यक्त होते

त्यांच्या देशप्रेमाची चाहूल;

देशवासीयांच्या काळजीने

पडते त्यांचे पाऊल.


देशसेवेचे व्रत घेऊन

खेळतात रक्ताची होळी;

ना माहीत घर-संसार

ना माहीत दसरा-दिवाळी.


प्रत्येक क्षण जगतात

ते जीवन-मरणा संग;

डोळे मिटत नाही त्यांचे

पाहिल्याविना तिरंग्याचे रंग.


तिरंगा फडकावा सातासमुद्रापार

सलाम त्याच्या पवित्र्याला;

डोळ्यांत अश्रू येतात

आठवून 'शहीद' जवानाला.


Rate this content
Log in

More marathi poem from Chandan Pawar

Similar marathi poem from Inspirational