STORYMIRROR

Ashwini Gorivale

Others

4  

Ashwini Gorivale

Others

मुंबई जादूची नगरी

मुंबई जादूची नगरी

1 min
11.5K


या मुंबईत वाहतात माया-ममतेचे झरे

चाकारमान्यानो या मुंबईत तुमचे मनापासून स्वागत आहे,

या मुंबईत होते दार सेकंदाला लाखो रुपयांची अफरातफर

तर इथेच मिळत नाही एका भुकेलयाला

त्याच पोट भरण्यासाठीही भाकर,


होताच अंधार झगमगते ही लख्ख दिव्यांनी

खेडेगावात मुलं भविष्य घडवतयात

चिमणीच्या प्रकाशानी ,

जना -सावित्रीच्या वेळी नऊवारी हाच

त्यांचा मूळ वस्त्रलंकार

अन इथे थांबत नाही लागलेल्या

नऊवारीला कत्रणाची धार,


झेप घेतली आभाळा या शहराची प्रगतीची

पण मूलभूत गरजांमध्ये गाठली हीने

पायरी गरिबीची,

प्रयत्नांची पराकाष्ठा करून करतात इथली

माणस कष्ट

तर तेवढ्याच संख्येने वाढलेत

बेरोजगारीची कुबडीचं जास्त ,


पाहुनी इथली झगमग परप्रांतीयांचा

होतो जीव खालीवर

दंगे ,बॉम्बस्फोट सारखे किती हल्ले

झाले आज पर्यंत तिच्यावर

त्यातूनही ती उभी आहे करण्यात मात

संकटावर,

अनेकांची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी

तिच्या खांद्यावर ,


तरीही डगमगत नाही ती कितीही संकटे

आल्यावर

ताठ मानेने उभी आहे अजून

भारताच्या नकाशावर,

अशी हि मुंबई वसते सगळ्यांच्या हृदयात

अभिमान आहे आम्हाला तिचा अन

आमचा मुंबईकर असण्यात .......


Rate this content
Log in