STORYMIRROR

Ashwini Gorivale

Others

3  

Ashwini Gorivale

Others

आई....

आई....

1 min
548


ऐकायची गंं तुझ्या कुशीत येऊनी मला अंगाई

इथली झोप खूप झाली आता उठू दे ना आई...


काळोख हा डोळ्यांपुढला उडूनी कोठे गेला

सोसवत हा नाही वारा प्रकाश कुठूनी हा आला....


गेले कुठे जग ते माझे ज्यात मी दडलेली

पाहायचे मला तुला सांग कुठे तू आई....


डोळे विस्फारूनी का बघती सारे माझ्याकडे

गोड तुझी परी ना मी मग घेऊन जा ना तुझ्याकडे....


ममतेच्या पडद्यापुढे उघडलेच ना मी माझे डोळे

कोणते ग बाबा आई? अवतीभवती अनोळखी सगळे...


जन्मताच मी का गं झाल्या पापण्या सगळ्यांच्याच ओल्या

तू म्हणायचीस, ' ती बघ हम्मा ' त्या अनीक कुणीकडे गेल्या?....


अजूनी काय काय आहे सांग ना गं तू आई

काय होत जे एवढं म्हणून सोडून जायची केलीस घाई.... ??


Rate this content
Log in