STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Inspirational

3  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

अर्थ नाही

अर्थ नाही

1 min
12K

अर्थ नाही त्या शब्दांना जिथे भावनांचा लवलेश नाही

अर्थ नाही त्या हसण्याला जिथे आनंदाचा गंध नाही

अर्थ नाही त्या स्पर्शाला जिथे आपुलकीचा रंग नाही

अर्थ नाही त्या सौंदर्याला जिथे मनाची पवित्रता नाही

अर्थ नाही त्या प्रेमाला जिथे हृदयाशी बंध नाही

अर्थ नाही त्या नात्याला जिथे निःस्वार्थ भाव नाही

अर्थ नाही त्या जगण्याला जिथे माणुसकीला थारा नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational