सुरूवात नवीन चैतन्याची
सुरूवात नवीन चैतन्याची
का रे मना उगीचच विचार करी
थोडं तरी धीर धरी
गेलेली वेळ पुन्हा येऊ नाही शकत
पण तू अजूनही सकारात्मक
राहून उरलेले उद्देश्य
पूर्ण करायला आहे सशक्त
अता हेच संपुष्टी करून
झालं ते चांगलंच झालं
चाललंय ते मस्तच चाललंय
होणार ते उत्तमच होणार
कशाला उगाचच संकोच व्यर्थ
चिंता नि तणावाला शून्य अर्थ
क्षुल्लक गोष्टींसाठी, तोंडाची हवा गौण
शक्य तेवढा संयम, योग्य तिथे मौन
प्रयत्न करणे आपले काम
यशस्वी करणे परमेश्र्वराच्या हातात
विजय, ऐश्वर्य, किती नांदेल क्रमाक्रमाने दारात
झोकून दे स्वत:ला, झोकून दे स्वतः ला,
होऊनी स्वत: मग्न आपल्या कामात
अडथळ्यांवर मात करून
अंतर्मनाने करू नव्याने सुरूवात
नवीन चैतन्य आणि वात्सल्याने
नवजीवनाची
