प्रेमरूपी नाव
प्रेमरूपी नाव
तू तरी समज माझ्या प्रेमाची भाषा
सार्थक व्हावे या जन्मी हे जीवन
हीच हृदयाची प्रेमळ अभिलाषा
संसारात किती तरी उन्हात आणि पावसाळ्यात
प्रेम बंधनेच्या या नावेत तुझ्याच बरोबरच गेले वाहत
या छंदात कष्टांनी पोहताना किती भीती वाटली रे मला
पण ह्या सगळ्या प्रवासात आपल्या अटूट प्रेमाच्या
संगतिने विश्वासाची डोर साधून सर्व नाती गेले जपत
जीवनात सर्व दिशांची परिक्रमा करताना
आयुष्याच्या पलीकडे आहे हे आपले खरे प्रेम
ह्यास प्रेमा सोबत जीवनाची करूया नव्याने सुरूवात
पसरूदे चहुकडे ह्या पुष्प रूपी सहवासाचा सुगंधित रंग
आपल्या प्रीतिला बघून झाले सर्वजण दंग

