उब मायेची
उब मायेची
जीवन हे अनमोल कर्तृत्वबाज.
ऊन,पाऊस, थंडी, काट्यांची शेज.
देशाच्या सरहद्दी संरक्षणा जिगरबाज.
उब मायेची मातृभूमीची शोभे साज.
डोळस पहारा, आस देशहिताची,
कर्तव्य कठोर राखे झेंड्याची शान.
धन्य तो वीर,माता,पत्नी परिवार,
विरह सोसत,हसत करे बलिदान.
युध्दात समोर भेदभाव, विसरून
देत छातीवर वार,दगाबाज दुश्मन.
सीमेवर लढतो,फेडून ऋणानुबंध,
सारे देशवासी हेच माने कुटुंब.
शत्रूचा खात्मा निखारा डोळ्यात,
मातृभूमीच्या रक्षणा रात्रभर जागत.
उब मायेची सरे आठवणीत,
हसतहसत शहीद जगाचा निरोप घेत.
